अ)पहिला प्रकार :-
१) कस्तुरी ,२) चंदन , ३) शेंदुर , ४) लालगंध , ५) केशर ,
६) अगरु , ७) नगर , ८) कुंकू
ह्या सर्व गंध :- पदार्थांना एकत्र बारीक कुटून एकजीव होईपर्यंत घोटून
मिसळून प्रवाही करावे. ह्याला अष्टगंध असे म्हणतात.
आ) दुसरा प्रकार :-
१) कापूर , २) कस्तुरी , ३) केशर , ४) कुंकू , ५) चंदन , ६) अगर व गव्हाचे
मिश्रणही असते.
ह्याला सुध्दा अष्टगंध असे म्हणतात.
इ ) तिसरा प्रकार :- १) केशर , २) कस्तुरी , ३) कापूर , ४) गंध , ५) लालगंध , ६) अगर
त्याच
प्रमाणे तगर ह्याचे सुध्दा मिश्रण ह्याअष्टगंधातअसते.
ई) चौथा प्रकार :-
देवीचेअष्टगंध :- १) गंध (चंदन), २) अगर , ३) कुंकू , ४) गोरोचन , ५) शिलाजित , ६) जटामांसी , व ७) कापूर
ह्या सर्वांचे मिश्रण करून देविसाठी अष्टगंध तयार करावे,मात्र कोणत्याही प्रकाराने अष्टगंध तयार करताना प्रत्येक वस्तू क्रमाक्रमाने एक एक
भागाने वाढवत न्यावी व अशा प्रकारे अष्टगंधतयार करावे.
ह्याच नियमाने अन्य
प्रकार तयार करावे.
इतर देव-देवतांचे अष्टगंधात कोणत्याही कमी अधिक प्रमाणात
असतात.
असे एकूण अष्टगंधाचे हे चार प्रकार आहेत.