ब्रम्हाचार्यो वसिष्ठो~त्रिर्मनुः पोलत्स्य लोमशौ! मारीचिरंगिरो व्यासो नारदः शौनको भृगुः!
चवनो यवनो गर्गः कश्यपश्य पराशरः !
अष्टदशैते गंभीराः ज्योतिःशास्त्र प्रवर्तकाः!!
पंचांग म्हणजे काय?
तिथिर्वारश्च नक्षत्रं योगः करणमेव च !
पंचांगैरविन्तं हौतैः पंचांग तव्दिदो विदु !!
१) तिथी २) वार ३) नक्षत्र ४) योग ५) करण
|| अथ: सार्थ नवग्रहस्तोत्रमंत्रस्य: ||
१)सूर्य मंत्र:-
जपाकुसुमसंकाशं काश्यपेयंमहाद्युतिम्।
तमोरिमसर्वपापघ्नंप्रणतोस्मिदिवाकरम्॥१॥
अर्थ:-
जास्वंदीच्या फुलाप्रमाणे लाल रांग असलेल्या, कश्यपाच्या कुळात जन्मलेल्या, विशाल प्रखर तेज असलेल्या, काळोखाचा शत्रू असलेल्या, सर्व पापे नाहीशी करणार्या दिवाकराला मी विनम्रतेने वंदन करतो.॥१॥
२) चंन्द्र मंत्र:-
दधिशंखतुषाराभंक्षीरार्णवसंभव।नमामिशशिनंसोमंशम्भोर्मुकुटभूषणम्॥२॥
अर्थ:-
दही, शंख आणि तुषार म्हणजे दवबिंदुप्रमाणे शोभायमान रंग असलेल्या. क्षीरसागरातून उत्पन्न झालेल्या , अंगावर सशाचे चिन्ह धरण करणार्या, शिव शंकराच्या मुकुटाचे भूषण असलेल्या वनस्पती औषधींच्या सोम राजा चंद्राला मी नस्कार करतो. ॥२॥
३)मंगळ मंत्र:
धरणीगर्भसम्भूतंविद्युत्कान्तिसमप्रभम्।
कुमारंशक्तिहस्तंचमंगलं प्रणमाम्यहम्॥३॥
अर्थ:-
पृथ्वीच्या गर्भापासून जन्मलेल्या. वीजेप्रमाणे अंगाचे तेज आणि प्रभा असलेल्या, हातात शक्ति धारण करणार्या, कुमार अवस्थेतील मंगळाला मी नमस्कार करतो.॥३॥
४) बुध मंत्र:
प्रियङ्गुकलिकाश्यामंरूपेणाप्रतिमंबुधम्।सौम्यंसौम्यगुणोपेतंतंबुधंप्रणमाम्यहम्॥४॥
अर्थ:-
अशोक वृक्षाच्या कळीप्रमाणे श्यामवर्ण असलेल्या, अप्रतिम रुपवान, बुध्दिमान, सौम्य स्वभावाच्या गुणी वत्सल बुध ग्रहाला मी नमस्कार करतो.॥४॥
५) गुरू मंत्र:
देवानांचऋषीणांचगुरुंकाञ्चनसन्निभम्।
बुद्धिभूतमत्रिलोकेशंतंनमामिबृहस्पतिम्॥५॥
अर्थ:-
देव आणि ऋषिंचा गुरू असलेल्या, सोन्याप्रमाणे रंग असलेल्या,बुध्दिमान, त्रैलोक्याचा स्वामी असलेल्या जगद्वन्द्द्य बृहस्पती गुरूला मी नमन करतो.॥५॥
६) शुक्र मंत्र:
हिमकुन्दमृणालाभंदैत्यानंपरमंगुरुम्।सर्वशास्त्रप्रवक्तारंभार्गवंप्रणमाम्यहम्॥६॥
अर्थ:-
बर्फ, कुन्दाची फुले अथवा हिम कमलाच्या देठा प्रमाणे प्रभा असलेल्या, दैत्यांचा परं गुरू, सर्व शास्त्र प्रवक्ता भार्गवा शुक्राला मी प्रणाम करतो.॥६॥
७) शनि मंत्र:
नीलाञ्जन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम् ।
छाया मार्ताण्ड सम्भूतं तं नमामि शनैश्चरम् ॥ ७ ॥
अर्थ:-
निळ्या काजळासारखी प्रभा असलेला सूर्यपुत्र, यमाचा मोठा भाऊ , सूर्य आणि छाया यांच्यापासून निर्माण झालेल्या, मंद गती असलेल्या शनैश्चराला मी नमस्कार करतो ॥ ७ ॥
८) राहू मंत्र :
अर्थकायंमहाविर्यांचन्द्रादित्यविमर्दनम।
सिंहिकागर्भसम्भूतंतंराहुंप्रणमाम्यहम्॥८॥
अर्थ:-
अर्धे शरीर असलेल्या , चंद्रसूर्यालाही पीडा देणार्या, सिंहिकेच्या गर्भापासून जन्म झालेल्या महा पराक्रमी राहुला मी प्रणाम करतो. ॥ ८ ॥
९) केतू मंत्र:
पलाशपुष्पसंकाशं तारकाग्रहमस्तकम्।
रौद्रंरौद्रात्मकंघोरंतंकेतुंप्रणमाम्यहम्॥९॥
अर्थ:-
पळसाच्या फुलासमान लाल रंग असलेल्या, तारांगणाचे शीर्ष म्हणजे सर्व तारे व ग्रहांमध्ये श्रेष्ठ असलेल्या भयंकर रौद्र स्वरूपाच्या भयप्रद तापदायक केतूला मी नमस्कार करतो.॥९॥
⛳⛳⛳⛳⛳⛳
***** वैदिक काल से ग्रहों की अनुकूलता के
प्रयास किए जाते रहे हैं। यजुर्वेद में 9 ग्रहों
की प्रसन्नता के लिए उनका आह्वान किया
गया है। यह मंत्र चमत्कारी रूप से
प्रभावशाली हैं।
प्रस्तुत है नवग्रहों के लिए विलक्षण वैदिक मंत्र-
✳ सूर्य-
ॐ आ कृष्णेन रजसा वर्तमानो निवेशयन्नमृतं
मर्त्यं च। हिरण्ययेन सविता रथेना देवो याति भुवनानि
पश्यन् (यजु. 33। 43, 34। 31)
✳ चन्द्र-
ॐ इमं देवा असपत्नं सुवध्यं महते क्षत्राय
महते ज्यैष्ठ्याय महते जानराज्यायेन्द्रस्येन्द्रियाय।
इमममुष्य पुत्रममुष्ये पुत्रमस्यै विश एष
वोऽमी राजा सोमोऽस्माकं ब्राह्मणानां राजा।।
(
यजु. 10। 18)
✳भौम-
ॐ अग्निमूर्धा दिव: ककुत्पति: पृथिव्या अयम्।
अपां रेतां सि जिन्वति।। (यजु. 3।12)
✳ बुध-
ॐ उद्बुध्यस्वाग्ने प्रति जागृहि त्वमिष्टापूर्ते
सं सृजेधामयं च। अस्मिन्त्सधस्थे अध्युत्तरस्मिन् विश्वे
देवा यशमानश्च सीदत।। (यजु. 15।54)
✳ गुरु-
ॐ बृहस्पते अति यदर्यो अर्हाद् द्युमद्विभाति
क्रतुमज्जनेषु। यद्दीदयच्छवस ऋतुप्रजात
तदस्मासु द्रविणं धेहि चित्रम्।। (यजु. 26।3)
✳ शुक्र-
ॐ अन्नात्परिस्त्रुतो रसं ब्रह्मणा
व्यपित्क्षत्रं पय: सोमं प्रजापति:। ऋतेन सत्यमिन्द्रियं
विपानं शुक्रमन्धस इन्द्रस्येन्द्रियमिदं पयोऽमृतं मधु।।
(यजु. 19।75)
✳ शनि-
ॐ शं नो देवीरभिष्टय आपो भवन्तु
पीतये। शं योरभि स्त्रवन्तु न:।। (यजु. 36।
12)
✳ राहु-
ॐ कया नश्चित्र आ भुवदूती
सदावृध: सखा। कया शचिष्ठया वृता।। (यजु. 36।4)
✳केतु-
ॐ केतुं कृण्वन्नकेतवे पेशो मर्या अपेशसे।
समुषद्भिरजायथा:।। (यजु. 29।37)
नवग्रह स्तोत्र मराठी अर्थः
१) जास्वंदीच्या फुलाप्रमाणे लाल अंगकांती असलेल्या, कश्यप ऋषींच्या वंशांत जन्मलेल्या अत्यंत तेजस्वी, अंधाराचा शत्रू, सर्व प्रकारची पापे नष्ट करणार्या दिवसाच्या राजाला, सूर्याला मी नमस्कार करतो.
२) दही आणि शंख यांच्या तुषारांप्रमाणे शोभून दिसणार्या, क्षिरसागरांतून निर्माण झालेल्या, भगवान शंकराच्या डोक्यावर दागिन्यांप्रमाणे शोभणार्या आणि ससा धारण केलेल्या सोमाला (चंद्राला) मी नमस्कार करतो.
३) धरणीच्या पोटांतून जन्म घेतलेल्या, विजेसारखी अंगकांती असलेल्या, हातात शक्ती हे शस्त्र धारण केलेल्या, कुमारस्वरूप अश्या त्या मंगळाला मी नमस्कार करतो.
४) अशोकाच्या फुलाप्रमाणे लाल-श्यामल रंग असलेल्या, अति रूपवान, बुद्धिवंत, सोज्वळ, सरळमार्गी, सुस्वभावी बुधाला मी नमस्कार करतो.
५) देवांचा आणि ऋषींचा गुरु, सोन्यासारखी अंगकांती असलेल्या, अति बुद्धिवंत, त्रिलोकांत श्रेष्ठ अशा त्या बृहस्पतीला (गुरूला) मी नमस्कार करतो.
६) हिमकमळाच्या देठाप्रमाणे प्रभा असलेल्या, दैत्यांचा गुरु असलेल्या, सर्व शास्त्रांचे ज्ञान असलेल्या, भृगुकुळांत जन्मलेल्या शुक्राला मी नमस्कार करतो.
७) निळ्यारंगाची प्रभा असलेल्या, सूर्यपुत्र, यमाचा मोठा भाऊ असलेल्या, त्या शनैश्चराला (शनीला) मी नमस्कार करतो.
८) अर्धेच शरीर धारण केलेल्या, वीर्यवान, चंद्र-सूर्याला छळणार्या, सिंहीकेपासून जन्मलेल्या त्या राहूला मी नमस्कार करतो.
९) पळसाच्या फुलाप्रमाणे लाल, तारका आणि ग्रहांमध्ये प्रमुख, भीती निर्माण करणार्या, रुद्राप्रमाणे तापदायक, अशा केतुला मी नमस्कार करतो.
१०) याप्रमाणे श्रीव्यास ऋषींच्या मुखांतून निघालेले हे नवग्रह स्तोत्र जो कोणी दिवसा आणि रात्री पठण करेल त्याची सर्व विघ्ने नष्ट होतील.
११) नर-नारी-राजा या सर्वांची दुःखे नष्ट होतील. त्यांचे ऐश्वर्य, आरोग्य आणि श्रेष्ठत्व यांची वृद्धी होईल.
१२) ग्रह, नक्षत्र, चोर आणि अग्नी यांपासून होणारा त्रास नष्ट होईल यांत संशय नाही असे श्रीव्यास ऋषी म्हणतात.
अशारीतीने श्रीव्यास ऋषींनी रचिलेले हे नवग्रह स्तोत्र संपूर्ण झाले.